HOME   टॉप स्टोरी

असून पाणी, पुसना कोणी!

गोरक्षणच्या विहीरीत प्रचंड पाणी, त्यांनाही मिळेना, लोकांनाही मिळेना


लातूर: लातूर शहरातील गोरक्षणच्या १०५ फुटी ऐतिहासिक विहिरीत ७० ते ७५ फूट पाणी आहे. उपसल तेवढं पाणी अगेच येतं. या विहिरीनं १९७२ च्या दुष्काळात लातुरकरांची तहान भागवली आहे. नंतर या विहिरीचा उपयोग फक्त गणपती विसर्जनासाठी झाला. २०१६ मध्ये जेव्हा भीषण टंचाई आली तेव्हा सुकाणू समितीनं प्रशासनाच्या मागे लागून या विहिरीचं खोलीकरण करुन घेतलं, गाळ काढून घेतला. मग या विहिरीतून गोरक्षणवासियांना पाणी मिळालं. रोज २० ते २५ टॅंकर शहरासाठी जाऊ लागले. पुन्हा पाऊस झाला अन सगळे विसरुन गेले. मनपाने वीज पुरवठा बंद केला. मोटारही काढून नेली. आज या विहिरीत मुबलक पाणी आहे. बाहेरुन पाणी आणले जाते. पण शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या जीवंत आणि खात्रीच्या स्रोताकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. या भागातले नगरसेवकही याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. निवडणुकीपुरते येतात पुन्हा तोंडही दाखवत नाहीत असा आरोप या भागातील नागरिक करतात.


Comments

Top