HOME   टॉप स्टोरी

यार्डात आंबा महोत्सव, कोकणच्या राजाची हजेरी

वेगवेगळे हापूस, दशेरी, केशर उपलब्ध, कोकणचा मावा अल्प दरात


लातूर: लातुरच्या मार्केट यार्डात यंदा दुसर्‍या वर्षी आंबा महोत्सव भरवण्यात आलाय. या महोत्सवात हापूसचे वेगवेगळे नमुने उपलब्ध आहेत. साडे तिनशे ते साडे चारशे रुपये डझन असा यांचा भाव आहे. सिंधुदुर्गातील विक्रेते बालाजी ठाकूर यांनी हे आंबे लातुरात आणले आहेत. हापूस सारखा आंबा अल्पदरात मिळतो याबद्दल ग्राहक जयेश गंगर यांनी व्यक्त केला. लातुरात किलोवर आंबा विकण्याची पद्धत आहे. आम्ही डझनावर विकतो. यापुढे आम्हीही किलोवर देण्याचा प्रयत्न करु असं बालाजी ठाकूर सांगतात.
पणन संचालनालय आणि लातूर बाजार समितीच्या वतीने हा उपक्रम राबवला जातो. उत्पादक ते ग्राहक अशा थेट विक्रीमुळे दोघांचाही फायदा होते. हा महोत्सव तीन तारखेपर्यंत चालणार आहे. ग्राहक आणि शेतकर्‍यांची सोय व्हावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे, सर्वांनीच या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे उप सभापती मनोज पाटील यांनी केले आहे. या महोत्सवातील आंबे हे सेंद्रीय तर आहेतच शिवाय ते नैसर्गिक पद्धतीने पिकवण्यात आले आहेत अशी माहिती संयोजकांनी दिली.


Comments

Top