HOME   टॉप स्टोरी

शिक्षकांचे उपोषण, दोघे चिंताजनक, मुंडनही करुन घेतले

आंतरजिल्हा बदलीप्रकरणी १९३ शिक्षकांना सामावून घेण्याची मागणी


लातूर: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली बाबतचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. ज्यात ३३९ शिक्षकांच्या बदल्याचा समावेश आहे. मात्र त्यापैकी १४६ शिक्षकांना सामावून घेवून १९३ शिक्षकांना रिक्त जागा नसल्याने तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. जशा जागा रिक्त होतील त्याप्रमाणे सामावून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. परंतु आजतागायत लातूर जिल्हा परिषदेने रिक्त जागा असूनही १९३ पैकी एकाही शिक्षकाला सामावून घेवून पद्स्थापना दिली नसल्याची माहिती येथील शिक्षक शाम राठोड यांनी आजलातूरला दिली. गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करुन सुद्धा शिक्षकांच्या या मागणीकडे लक्ष दिले जात नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषणासोबतच घंटानाद आंदोलन, बोंबा ठोक आंदोलन, मुंडन आंदोलन, तसेच यानंतर परिवारासह ठिय्या आंदोलन, पालकमंत्र्याच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन, स्व. विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत डोळे बंद व मौन धारण करुन तिव्र उन्हात आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. या उपोषणात ०२ उपोषणकर्ते किशोर शिंदे आणि बालाजी राठोड यांची प्रकृती चिंताजनक आहे. उपोषणात बालाजी कलमे, शाम राठोड, अशोक राठोड, विश्वास अनंतवाड, पांडूरंग पेठे, सिध्दार्थ काबंळे, गणेश हंचाटे, यांच्यासह अनेक शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.


Comments

Top