HOME   टॉप स्टोरी

शांतता आणि समृद्धीसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी केली नमाज अदा


लातूर: दरवर्षीप्रमाणे मुस्लिम समाज बांधवांनी शहरातील ईदगाह मैदान याठीकाणी रमजान ईदची नमाज अदा केली. नमाज अदा करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुफ्ती साबेरखान कास्मी यांनी नमाज पठन केले तर बयान मौलाना मोईजोद्दीन कास्मी यांनी केले. तसेच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनीही अल्लाह्च्या कृपेने यावर्षी चांगला पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यासाठी खासदार सुधाकर श्रृंगारे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने, आ. विक्रम काळे, मकरंद सावे, उपमहापौर देविदास काळे, मनपा सभापती दीपक मठपती, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, मोईज शेख, तहसिलदार अविनाश कांबळे, नवनाथ आल्टे, प्रशांत पाटील, संजय जेवरीकर आदिंची उपस्थिती होती. नमाज अदा केल्यानंतर सर्व मुस्लिम समाज बांधवानी रमजान ईदच्या एकमेकांना गळाभेट करुन शुभेच्छा दिल्या.


Comments

Top