HOME   टॉप स्टोरी

कोंडवाड्यातले प्लास्टीक पेटले, प्रचंड प्रदूषण

मोकाट जनावरे रस्त्यावर, कोंड्वाड्यात प्लास्टीकचा कचरा, अजूनही आग सुरुच


लातूर: ही कथा आहे लातुरच्या कचर्‍याची. वरवंटीचा कचरा नेहमी पेटत असतो. आता शहरात जमवलेला प्लास्टीकचा कचराही पेटू लागला आहे. काल रात्री असाच कचरा पेटला (की पेटवला?). आकाशात काळ्या पांढर्‍या धुराचे मोठे लोट उसळत होते. किमान अर्ध्या शहराला या धुराने प्रदुषित केले. अग्निशामक दलाने प्रयत्न करुनही आग आटोक्यात आली नाही. आजही ही आग धुमसत होती. ती विझवण्याचे कष्ट कुणीही घेतले नाहीत. जिल्हा बॅंकेच्या मागे मोकाट जनावरांचा कोंडवाडा आहे. इथे जनावरे कधीच नसतात. ती रस्त्यावर मोकाटपणे फिरत असतात कोंडवाड्यात मात्र जनाधार संस्थेच्या कर्मचार्‍यांनी जमवलेला प्लास्टीकचा कचरा असतो. वर्गीकरण आणि पुनर्निमाण या नावाखाली तो जमवला जातो. कोंडवाडा भरला की त्याला आग लागते. वारंवार लागते. का लागते की लावली जाते याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. जनाधार संस्थेचे प्रमुख संजय कांबळे यांनीही याबाबत काहीच सांगितले नाही. मी आता बाहेरगावी आहे, आल्यावर बघावं लागेल हे त्यांचं नेहमीचं उत्तर काल रात्रीही ऐकायला मिळालं.


Comments

Top