HOME   टॉप स्टोरी

आयारामांना पहिली संधी, विखे पाटील, जयदत्त कॅबिनेट

फडणवीस मंत्रीमंडळात नवे तेरा मंत्री, १० भाजपचे, ०२ सेनेचे एक रिपाइंचा


मुंबई: आज राज्यातल्या फडणवीस सरकारने केलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात आयाराम राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षिरसागर यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेण्याची संधी दिली. आज मंत्रीमंडळात एकूण तेरा जणांना सामावून घेण्यात आले. यात भाजपाचे १०, शिवसेनेचे दोन तर रिपाइंच्या आठवले गटाच्या एका मंत्र्याचा समावेश आहे. हा विस्तार बहुप्रतिक्षित होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तो केला गेला. या मंत्र्यांना खातं माहित करुन घेऊन कामाला सुरुवात करण्याआधी आचारसंहिता समोर येऊन थांबणार आहे.
नव्या मंत्र्यात राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षिरसागर, आशिष शेलार, संजय कुटे, सुरेश खाडे, अनिल बोंडे, अशोक उइके, तानाजी सावंत, योगेश सागर, अविनाश महतेकर, संजय भेगडे, परिणय फुके आणि औरंगाबादचे अतुल सावे यांचा समावेश आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात बाजुला फेकले गेलेले एकनाथ खडसे यांना संधी मिळण्याची अपेक्षा होती पण तसे झाले नाही. यावर त्यांना प्रतिक्रिया विचारली असता पक्षाचा निर्णय शिरसावंद्य असल्याचे ते म्हणाले. आयात नेत्यांचा शपथविधी पहिल्यांदा झाला यावर त्यांनी पक्षनिष्ठ प्रतिक्रिया दिली. बाहेरच्या पक्षातून आलेल्या गुणवंतांना संधी दिल्याने आपल्या पक्षाला लाभ होऊ शकतो असं ते म्हणाले.


Comments

Top