HOME   टॉप स्टोरी

ठिकठिकाणी झाली योगासने, तरुणांचा मोठा सहभाग

लातुरात आर्ट ऑफ लिव्हिंगने घेतला पुढाकार, महिलाही मोठ्या संख्येने हजर


लातूर: आज जागतिक योग दिन. भारतासह जगभरात कोट्यावधी लोकांनी योगाभ्यास गिरवला. लातूर शहरात अनेक ठिकाणी सकाळी सहा ते आठ या वेळेत अशा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील शाम मंगल कार्यालयात आर्ट लिव्हिंगच्या वतीने योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. राजस्थानच्या सुप्रिता कुनावत यांनी उपस्थितांना योग शिकवला. योगाचे महत्व पटवून सांगितले. आर्ट ऑफ लिव्हींगचे जिल्हा समन्वयक कैलास जगताप, बालाजी साळूंके, सतीश देशमुख यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.


Comments

Top