HOME   टॉप स्टोरी

पेट्रोल-डिझेल महागणार, सोन्याच्या करात अडीच टक्क्यांनी वाढ

रेल्वे विकासावर जोर, खाजगी भागिदारी वाढविणार


पेट्रोल-डिझेल महागणार, सोन्याच्या करात अडीच टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वधारलेला शेअर बाजार, सादरीकरण सुरु असताना घसरला. सोन्यावरील करात अडीच टक्क्यांची वाढ करीत पेट्रोल आणि डिझेलवर नव्याने एक रुपयाचा सेस लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संकल्पात लोकप्रिय घोषणांना फारसा थारा देण्यात आला नाही. शिवाय केलेल्या कामांचं कौतुकही करुन घेण्यात आलं आहे. रेल्वेच्या विकासासाठी पीपीपी हा नवा फॉर्म्युला स्विकारला जाणार आहे. अर्थात जनतेची भागिदारी अपेक्षित केली जात आहे. प्रत्येकाला घर, प्रत्येक घराला पाणी आणि दर्जेदार शिक्षण देण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. हे करीत असताना विकास दर वाढवण्याचे आणि रोजगार देण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. यातील काही ठळक मुद्दे या प्रमाणे.....
* देशातील बॅंकांची आर्थिक स्थिती सुधारणार
* सार्वजनिक बॅंकांना आर्थिक मदत करणार
* ग्रामीण महिलांच्या विकासाकडे अधिक लक्ष देणार
* क्रीडा विकासासाठी नव्या बोर्डांची स्थापना
* भारताला उच्च शिक्षणाचे बनविणार
* २० रुपयांचे नवे नाणे आणणार
* एक, दोन आणि पाच रुपयांची नवी नाणी चलनात आणणार
* मोठ्या कंपन्यातील सरकारची भागिदारी काढून घेणार
* अनेक सरकारी कंपन्यांची विक्री केली जाणार
* इलेक्ट्रीक वाहन निर्मितीला प्रोत्साहन, जीएसटी १२ टक्क्यांवरुन पाच टक्क्यांवर आणणार
* इलेक्ट्रीक वाहनधारकांना करात मिळणार सवलत
* पारंपारिक नृत्यप्रकारांचे संवर्धन, कलावंतांना मानधन
* ०३ कोटी लघुद्योजकांना मिळणार पेन्शन
* पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपयांचा सेस, महागणार
* सोन्यावरील करात अडीच टक्क्यांची वाढ
* आयात इलेक्ट्रॉनिक वस्तुंवरील कर वाढणार
* सोन्यावरील कस्टम ड्युटी अडीच टक्क्यांनी वाढणार
* आयकर भरण्यासाठी आधार कार्ड गरजेचे पॅन कार्डची आवश्यकता नाही
* बजेटवर शेअर बाजार नाराज
* नोकरदार महिलांसाठी काहीच नाही, उद्योजक महिलांना स्वस्तातले कर्ज
* श्रीमंतांचा कर वाढला
* स्टार्ट अप इंडियासाठी नवं चॅनल सुरु करणार
* कर रचनेत कुठलाही बदल नाही, पाच लाखांवरील वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर लागू
* रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करणार
* उच्च शिक्षणाला प्राधान्य, नवे शैक्षणिक धोरण आखणार
* झिरो बजेट फार्मिंगला चालना देणार
* परदेशी विमा कंपन्यांना १०० टक्के मुभा
* प्रामाणिक करदात्यांचे अर्थमंत्र्यांनी मानले आभार


Comments

Top