HOME   टॉप स्टोरी

साईबाबांचे भजन, अभिषेक आणि निघाली शहरातून पालखी

मंदीर ना संस्था, ना ट्रस्ट ना वर्गणी...एक युवक भरवतोय भक्तीचा महोत्सव


लातूर: आज गुरु पौर्णिमा. शेगाव, अक्कलकोट आणि शिर्डीत तीन दिवसांचा भक्ती सोहळा भरवला जातो. त्याचं अनुकरण महाराष्ट्रभर होतंय. लातुरात रत्नदीप भुरे हा मोबाईल विक्रेता मागच्या नऊ वर्षांपासून दोन दिवस साईबाबांच्या भक्तांना ही संधी उपलब्ध करुन देतोय. लातुरच्या चौदाघर मठात साईबाबा भजन संध्या झाली. सकाळी साडेसहा वाजता साईंचा अभिषेक झाला. त्यानंतर निघाली साईबाबांची पालखी. गांधी चौक, हनुमान चौक, गांधी मार्केट, पुन्हा चौदाघर मठ असा पालखीचा प्रवास. पालखी निघाल्यावर गांधी चौकातील महालक्ष्मी मंदिरात स्थिरावते. तेथे गवळी समाजाच्या वतीने पालखीतील सेवेकर्‍यांना दत्ता झिपरे नाश्त्याची सोय करतात. पालखी चौदाघर मठात परतल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. असा उपक्रम आजही राबवण्यात आला. पालखीचे जागोजागी स्वागत झाले. भाविकांनी मनोभावे माथा टेकला.


Comments

Top