HOME   टॉप स्टोरी

नवे वीज मीटर्स जनतेला फसवणारे, बसवणे थांबवा

वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा, डेमो द्या, परवानगी घ्या, मगच बसवा!


नवे वीज मीटर्स जनतेला फसवणारे, बसवणे थांबवा
वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा, डेमो द्या, परवानगी घ्या, मगच बसवा!
लातूर: लातूर शहरात बसवली जाणारी महावितरणची वीज मीटर्स सामान्यांचे नुकसान करीत आहेत. या मीटर्सवर नेहमीपेक्षा अधिक, अवाजवी बिले येत आहेत. यामुळे सामान्य माणसांसह सगळेच नागवले जात आहेत असा दावा करीत वंचित बहुजन आघाडीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यात आघाडीचा सहकारी पक्ष एमआयएमही सहभागी झाला होता. भारिप बहुजन महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. आंबेडकर पार्कवरुन निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे, स्थानिक आमदारांचे वाभाडे काढले. आमदार आपापल्या उद्योगात रममाण आहेत. त्यांनी उद्योगपती बनावे, लोकांनी आगामी निवडणुकीत त्याचा विचार करावा असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले. महावितरणच्या अधिकार्‍यांशी बोलताना संताप अनावर झालेल्या सूर्यवंशी यांनी स्वत:चे कपडे उतरवले. एवढंच विकायचं बाकी आहे, तेही विकून टाका असा त्रागा व्यक्त केला. अधिकार्‍यांनीही आपली हतबलता व्यक्त केली. नवे मीटर बसवताना आधी ग्राहकाची परवानगी घ्यावी, जुन्या आणि नव्या मीटरची तुलना करुन दाखवावी, ग्राहकाला पटल्यासच नवे मीटर बसवावे अशी मागणी मोर्चेकर्‍यांनी केली.


Comments

Top