HOME   टॉप स्टोरी

वेळामवस्या खड्ड्यात! रात्री घरी परतायचे कसे?

खड्ड्यांमुळे शेती गाठणे कठीण, अनेकजण तीनदा जेवले!


लातूर: १५ डिसेंबरला खड्डामुक्ती होणार आणि वेळामवस्येला गावाकडे, शेताकडे आरामात जाता येणार अशी लातुरकरांची अपेक्षा होती. पण झाले भलतेच. या खड्ड्यांमुळे अनेकांना गावाकडे, शेताकडे नीटपणे जाता आले नाही. अनेकजण मित्रांच्या शेताकडे निघाले. जायला वेळ लागतो म्हणून निघताना घरातून खाऊन निघाले. पण शेतात पोचेपर्यंत खड्ड्यांमुळे पोटातले जिरुन गेले. गेल्या गेल्या जेवायला बसले. भरपेट जेवले. शेतात फिरले. परत निघाले. वाटेतल्या खड्ड्यांनी पुन्हा पोटातले जिरवले. घरी पोचताच पुन्हा जेवायला बसले. या खड्ड्यांमुळे बाकी काय व्हायचे ते होवो पण पचन क्षमता मात्र वाढली एवढे मात्र नक्की!
शेताकडे खड्डे चुकवित जावे लागले, अनेकदा खड्ड्यातून जावे लागले. आमची वेळामवस्या ख्ड्ड्यात गेली. शेतात कसेबसे पोचलो पण आता लेकराबाळांना घेऊन रात्री गावाकडे कसे जायचे असा प्रश्न फुलचंद पाटील विचारतात. एकूणच यंदाची वेळामवस्या लातूरकरांसाठी अतिशय कठीण गेली. उत्तम पावसामुळे शेती बहरली आहे. रबी जोमात आहे. पण खड्ड्यांनी अनेकांच्या उत्साहावर पाणी फेरले.


Comments

Top