HOME   टॉप स्टोरी

दिमाखदार ध्वजारोहण सोहळा

पालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण, नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद


लातूर: लातुरच्या बाभळगाव पोलिस मैदानावर यंदाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ध्वजारोहण केले. राज्यासह जिल्ह्याने विकासकामात गाठलेली आघाडी त्यांनी कथन केलं. यावेळी दिमाखदार आणि परंपरेला साजेसं संचलन पार पडलं. पोलिस विभागासह, होमगार्ड, एनसीसीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला होता. त्यानंतर विविध विभागांचे रथ यात सहभागी झाले होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कारही करण्यात आला. विद्यार्थ्यांसह पालक, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक यावेळी उपस्थित होते.


Comments

Top