HOME   टॉप स्टोरी

सांगलीच्या सफाईला लातुरचे मास्क!

मदतीचा ओघ तसाच, आली विविधता-कल्पकता, ८४०० मास्क वापरणेही सुरु!


रवींद्र जगताप, लातूर: लातूर जिल्हा पूरग्रस्त सांगलीकरांना भरभरुन मदत करतोय. केली पाहिजे. त्यांनी आपल्याला कसलीही कुरकुर न करता पाणी दिलं. त्यामुळंच लातुरकरांचा उन्हाळा मागे पडला. आता त्याची उतराई करण्याची संधी आलीय. जमेल तो आपापल्या परिने मदत करतो आहे. आधी नेहमीसारखी मदत करण्यात आली. आता या मदतीत विविधता येऊ लागलीय. परवा एका संघटनेनं अंतरुण, पांघरुणं दिली. झंडू बामपासून लागणारी सामान्य औषधं पाठवली. अजयकुमार पाटलांनी कंगवे, तेलाच्या बाटल्या पाठवल्या. एका संघटनेनं सॅनिटरी नॅपकीन्स पाठवून महिलांची अडचण दूर केली. आता लातुरची धर्मवीर संघटना आणि सर्व लातूरकर संघटनेनं तोंडाला-नाकाला बांधायचे ८४०० मास्क पाठवले. शर्मा ट्रॅव्हल्सने पाठवलेले हे मास्क्स आता सांगलीत असलेले शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी उतरवून घेतले. सांगलीत शहराची जोरदार सफाई सुरु आहे. रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने सफाई करणार्‍या स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांना चांगला आधार झाला! लातुरकरांची कल्पकता अशीच बहरत राहो!


Comments

Top