HOME   टॉप स्टोरी

ताजोद्दीनबाबांना हवी लातूर शहरची उमेदवारी

आ. देशमुख महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात, मुस्लीमाला संधी द्या!


लातूर: आ. अमित देशमुख यांनी ग्रामीणमधून विधानसभा लढवावी, ते महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. लातूर हे मुस्लीम बहूल शहर असल्यानं आता मला संधी द्यावी असं मोटार मालक संघाचे अध्यक्ष ताजोद्दीनबाबा सांगतात. १९७२ पासून आपण कॉंग्रेसचं काम करतो, त्याकाळी लोकांना ट्रकनं आणावं लागायचं. तेव्हा आपण ही सेवा दिली. मला तिकिट द्यावं, ते मिळेलच, मी नक्कीच निवडून येईन असा विश्वासही बाबांनी व्यक्त केला. बाबांनी अलिकडेच उमेदवारीसाठी मुलाखतही दिली होती.


Comments

Top