HOME   टॉप स्टोरी

सांगलीतील नदीकाठच्या अनेक गावांना मदत हवीय!

नदीकाठची गावे भुकेली, लातुरच्या पथकानं केली दिग्रसमध्ये मदत


लातूर: पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापुरला महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणावर मदत मिळते आहे. मदत देणारे चांगल्या मार्गावरील गावांपर्यंत पोचत आहेत. मात्र नदीकाठच्या जर्जर गावांकडे फारशी कुणाची नजर जात नाही. मिळणार्‍यांना मिळतंच आहे पण भुकेल्यांची भूक वाढतच आहे. काही नदीकाठच्या गावात ट्रक पोचलेच तर लोक त्यावर तुटून पडत आहेत. काही ठिकाणी तर ट्रकचालकांना मारही खावा लागला. ही बाब जाणून लातुरच्या युवा सेना, red flood foundation आणि लव लातूर जीव लातूरया पथकाने सांगली जिल्ह्यातील मौजे डिग्रस या गावात मदत दिली. अन्नधान्य वस्तू तर दिल्याच शिवाय श्रमदानही केले. याचं कौतुक म्हणून या गावच्या सरपंच गितांजली इरकर आणि उप सरपंच प्रदीप कोळी यांनी या पथकाचा ग्रामपंचायतीत गौरव केला. सन्मान केला आणि आशीर्वादही दिले.
या गावातील ८० टक्के घरे पुरामूळे उद्धवस्त झाली आहेत. अनेक कूटूंबं रस्त्यावर आले आणि तेथील नागरिक अनंत अडचणीचा सामना करत आहेत. या गावात प्राथमिक गरजेचा गोष्टी पोहचल्यात. परंतू पुरामूळे तेथील वातावरण अत्यंत दूषित झाले आहे. तिथे वैद्यकीय मदतीची गरज होती. खासदार धैर्यशील माने व स्वरूप काकडे यांचा आदेशानुसार लातुरचे पथक वैद्यकीय मदत घेवून पोचले. ही मदत आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत तर केलंच पण गावचे सरपंच ईरकर यांनी ग्रांमपचांयत कार्यालय मध्ये संपूर्ण पथकाचा सन्मान केला. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील यांनी देखील कामाचे कौतूक केले. लातुरकरांच्या मदतीसाठी सांगलीकर पाठीशी आहेत असा शब्द दिला. ग्रामस्थांनी जनावरांचा चारा व वैद्यकीय मदतीचे आवाहन केले. यावेळी युवा सेना उप जिल्हाप्रमुख सौरभ बुरबुरे, आयटी सेना जिल्हाप्रमुख जीवन मुर्गे, युवासेना शहर समन्वयक विष्णू तिगीले, उप शहर प्रमुख अजय मदने, मार्गदर्शक अमर बुरबुरे, रमेश शेळके उपस्थित होते.


Comments

Top