HOME   टॉप स्टोरी

राष्ट्रीय अल्पसंख्याक दिन? नव्हे थट्टा दिवस, कार्यकर्त्यांचा संताप

हक्कांचं काय झालं? आमच्यापर्यंत नाही आलं, गांधी चौकात धरणे


लातूर: दरवर्षी अल्पसंख्याक दिन साजरा केला जातो. कागदावरच. अल्पसंख्याकांच्या हक्कांकडे मात्र कुणीही लक्ष देत नाही, या समाजाची परवड थांबावी, त्यांना मुख्य प्रवाहात आणलं जावं यासाठी प्रयत्न होत नाहीत, इतरांप्रमाणे हक्क मिळत नाहीत याचा निषेध करीत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीने आज गांधी चौकात धरणे आंदोलन केलं. फाटक्या कपड्यात तिरंगा घेऊन बसलेल्या या कार्यकर्त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे सरचिटणीस मोहसीन खान यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.
केंद्र आणि राज्य सरकारं अल्पसंख्याकांसाठी योजना जाहीर करतं. पण त्या नीटपणे राबवत नाही. आज अल्पसंख्याक हक्क दिवस आहे. या दिवसाचा त्यांनी अर्थच बदलून टाकला आहे. हा हक्क दिवस नव्हे तर थट्टा दिवस झाला आहे. ही सरकारं अल्पसंख्याकांच्या योजना नीटपणे राबवत नाही. योजना जाहीर होते पण त्यासाठी बजेट नसतं. शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण मिळत नाही. मौलाना आझाद मंडळाला बजेट मिळत नाही. अल्पसंख्याकांचा हक्क दिवस केवळ कागदोपत्री साजरा केला जातो. आमची थट्टा केली जाते, अल्पसंख्याकांना त्यांचे हक्क द्यावेत, न्याय द्यावा यासाठी हे आंदोलन करीत आहोत असे मोहसीन खान यांनी सांगितले. यावेळी अफजल कुरेशी, फिरोज शेख, अफजल लोखंडवाला, जावेद मनियार, रईस टाके, गौस बागवान, हसन अमीर, शेख सय्यद,इरफान बागवान, सद्दाम खान, आमीर सय्यद, अनवर बागवान उपस्थित होते.


Comments

Top