HOME   टॉप स्टोरी

संघाची भूमिका आरक्षण, संविधानाच्या विरोधात; तिरंगाही अमान्य

अफूच्या गोळ्या देणं चालू, सत्तालंपट पळताहेत, त्यांची औकात नाही- जितेंद्र आवाड


लातूर: लातुरातील एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आवाड लातुरात आले होते. त्यांच्याशी सद्यस्थितीवर चर्चा केली. ही चर्चा जशीच्या तशी देत आहोत. जितेंद्र आवाड यांच्या बोलण्यातील काही मुद्दे याप्रमाणे;
* ज्यांच्या कार्यालयावर तिरंगा ९० नंतर फडकला, त्यांच्याकडून आम्ही तिरंगा शिकायचा?
* त्यांच्या मते तिरंगा भारताला खड्ड्यात घालणारा
* मोहन भागवतांनी तीन वेळा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली
* संघाची मूळ भूमिका संविधानाच्या आणि आरक्षणाच्या विरोधात
* सगळेच नाराज असताना बहुमत कसं मिळालं? इव्हीएमवर संशय
* भारतीय अर्थव्यवस्था रसाताळाला, त्यांना विकास जन्माला घालायचा होता, मंदी जन्माला आली
* पळपुटे कुठल्या पक्षात नसतात? शिवाजी महाराजांना सोडून जाणार्‍यांचा इतिहासही आहेच
* शिवाजी महाराजांनी घडवलेली माणसं निघून गेली, ज्यांना काही मिळालं नाही ती तशीच राहिली
* ज्यांच्या घरात चाळीस चाळीस वर्ष सत्ता राहिली ते निघून जात आहेत
* नवीन पोरं तयार होताहेत, वारसा नसलेलीच पोरंच लढू शकतात
* लाठ्या काठ्या खायला सत्ता असणार्‍या घरातली पोरं येत नाहीत, चटणी भाकरी खाणारीच येतात
* अफूच्या गोळ्या देणं चालू आहे, हॅंग ओव्हर टाळण्यासाठी पुन्हा नशा, ती उतरु देणारच नाहीत
* इंदिरा गांधींचा पराभव होईल असं वाटलं होतं का? झाला की नाही
* पुरात प्रेतं वाहत असताना यात्रा कसल्या काढता?
* ही माणसं कामं करीत नाहीत, त्यांची औकात नाही
* आपली लोकं मंदी नाकारताहेत, उद्या तुमची घरं फुटल्यावर कळेल
* सत्तेतल्या लोकांना लवकर मग्रुरी आलीय, हिंदू-मुस्लीम, दलित-सवर्ण, विद्वेषाचं राजकारण करतात
* राज ठाकरेंवर २०११ च्या गुन्ह्याची चौकशी १९ मध्ये होते, हे संशयास्पद
* सामान्यांच्या मनात दहशत तयार करण्याचा प्रयत्न, खबरदार आमच्या विरोधात बोलाल तर!


Comments

Top