HOME   टॉप स्टोरी

लातुरात गणेशाचं आगमनपूर्व स्वागत

धाडस ढोलताशा पथकाचा उपक्रम, मुख्य रस्त्यावर शोभायात्रा


लातूर: श्रीगणेशाच्या आगमनाला मोजके दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर लातुरच्या धाडस ढोलताशा पथकानं गणेशाचं आगमनपूर्व स्वागत केलं. यासाठी गांधी चौकातून शोभायात्रा काढण्यात आली. गणेशाच्या भव्य मूर्तीसह निघालेली ही यात्रा शिवाजी चौकापर्यंत गेली. वाटेत गांधी चौकासह मिनी मार्केट, अशोक हॉटेल चौक, शिवाजी चौक आदी ठिकाणी या मंडळानं ढोलताशाची प्रात्यक्षिकं सादर केली.


Comments

Top