HOME   टॉप स्टोरी

बाप्पांच्या मूर्ती ३५ टक्क्यांनी महाग, पण मागणी वाढली!

रंगरंगोटीचा शेवटचा हात फिरवणे चालू, गणेशोत्सवाची सगळीकडेच लगबग


लातूर: दोन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. टंचाई-दुष्काळ असला तरी उत्साह कायम आहे. लातूर शहरातील गणेश मूर्तीकार मुर्त्यांवर रंगकामाचा शेवटचा हात फिरवण्यात गर्क आहेत. यंदा प्लास्टर ऑफ पॅरीस, लागणारे रंग, वीज, साचे, कामगारांचे वेतन या सगळ्या बाबी महागल्यानं ३५ टक्क्यांची भाववाढ सगळ्यांनाच सहन करणे क्रमप्राप्त आहे. प्रसिद्ध मूर्तीकार स्व. गुरुमूर्ती कोळ्ळे यांच्या कार्यशाळेस भेट देण्याचा योग आला. त्यांचे चिरंजीव आनंद कोळ्ळे गणेश मूर्ती घडवण्याचा वारसा चालवतात. नैसर्गिक प्रतिकुल आहे. आता बाप्पाच ठरवतील ते होईल असं ते म्हणतात.


Comments

Top