HOME   टॉप स्टोरी

लातुरला उजनीचं पाणी देणारंच हा माझा शब्द!

मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त, पुढच्या पिढीला दुष्काळ दिसणार नाही


लातूर: मागच्या चार वर्षात मराठवाड्याने भीषण दुष्काळ पाहिला. आता पुढची पिढी हा दुष्काळ पाहणार नाही, वॉटर ग्रीडच्या माध्यमातून सबंध मराठवाड्याला पाणी मिळेल. यासाठी औरंगाबाद आणि जालनाचे टेंडर निघाले आहे, उर्वरीत जिल्ह्यांसाठी लवकरच निघेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं ते लातुरात आले होते. टाऊन हॉलच्या मैदानावर त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी लातुरकरांनाही आश्वस्त केले. लातुरला उजनीचं पाणी देणारच. उजनीचं पाणी सिना नदीत आणि पुढे ते बोगद्याने लातुरपर्यंत आणले जाईल. संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वातच हे पाणी लातुरला येईल. दोन बोगद्यांचं काम सुरु आहे, त्यासाठी सहाशे कोटी रुपये दिले आहेत असेही ते म्हणाले.


Comments

Top