HOME   टॉप स्टोरी

गणेश मूर्ती खरेदी करणं कठीण!

राजस्थान शाळेमागे चिखलाचं राज्य, अनेकजण घसरले, वाहनांचेही हाल


लातूर: यंदा गणेश मुर्त्यांची दुकानं राजस्थान शाळेमागं थाटण्यात आली आहे. आधी ही दुकानं जुन्या रेल्वेमार्गावर झालेल्या रस्त्यावर उभारण्याची परवानगी देण्यात आली. नंतर तिथले मंडप काढून राजस्थान शाळेमागे पिटाळण्यात आले. दोन दिवस पाऊस पडला. या ठिकाणी चिखलाचं राज्य निर्माण झालं. आज सकाळपासूनच ग्राहक-भाविकांनी या चिखलाशी दोन हात करीत कसेबसे गणेश मुर्तींची खरेदी केली. अनेकजण या चिखलात घसरले, अनेक वाहनांना मोठे हाल सोसावे लागले.


Comments

Top