HOME   टॉप स्टोरी

१३ सप्टेंबरचा लातूर बंद कशासाठी?

नागरिक हक्क कृती समिती आक्रमक, शहरातून मोठा प्रतिसाद, शांततेत बंद


लातूर: येत्या १३ सप्टेंबरला लातुरच्या नागरिक हक्क कृती समितीने बंद पुकारला आहे. सातत्याने वाढून येणारी वीज बिले, महानगरपालिकेने वाढवलेले कर आणि दुष्काळ यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या हक्कासाठी हे आंदोलन केले जात आहे. कुणाचाही वीज पुरवठा खंडीत केला जाणार नाही, मनपा सक्तीने वसुली करणार नाही असे आश्वासन पालकमंत्र्यांनी जाहीरपणे दिले होते. त्याची अमलबजावणी झाली नाही. मनपाने कराचा विषय सर्वसाधारण सभेत ठेऊ असे सांगितले पण केवळ वेळ मारुन नेण्यात आली. लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, वीज बिलातील वाढ रद्द करावी, मनपाने कर कमी करावेत अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे असे नागरिक हक्क कृती समितीचे समन्वयक उदय गवारे यांनी आजलातूरला सांगितले.


Comments

Top