HOME   टॉप स्टोरी

निघाला मानाचा आजोबा गणपती

५९ वा उत्सव, यंदा फक्त मिरवणूक, विसर्जन करणार नाही


लातूर: लातूर शहरातील मानाचा मानला जाणारा भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाची मिरवणूक दुपारी अडीच वाजता निघाली. भव्य गणेश मूर्ती पुढे बाळगोपाळांची पौराणिक नृत्ये अशा थाटात ही विसर्जन मिरवणूक निघाली. पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याने या मंडळानेही मूर्ती विसर्जित करायची नाही असा निर्णय घेतला आहे. शोभायात्रेनंतर ही मूर्ती परत आणली जाईल विधीवत वर्षभर सांभाळली जाईल. पुढच्या वर्षी विसर्जन केलं जाईल असं उमाकांत कोरे यांनी सांगितलं. या मिरवणुकीत ढोलताशासह बाळ गोपाळांनी शोभा वाढवली. शिव आराधनेसह रावणाच्या शंकर आराधनेच्या श्लोकावर नृत्य सादर केलं.


Comments

Top