HOME   टॉप स्टोरी

संभाजी पाटीलांनी घेतली शिवाजीरावांची भेट

प्रकृतीची चौकशी, उपचारासाठी मुंबईला येण्याची विनंती, घेतले आशीर्वाद


निलंगा: राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची प्रकृती वृद्धापकाळाने खालावली आहे. ही बाब लक्षात घेऊन संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सपत्नीक आज डॉ. निलंगेकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान पालकमंत्री निलंगेकर यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करत पुढील उपचारासाठी मुबंई येथे येण्याची आग्रहाची विनंती केली. या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांनी पालकमंत्र्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. लातूर जिल्ह्याला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या रुपाने प्रथमच राज्याचे मुख्यमंत्रीपद प्राप्त झाले होते. जिल्ह्याच्या राजकारणातील जेष्ठ व्यक्तीमत्व असलेले डॉ. निलंगेकर जिल्ह्यासाठी पितृतुल्य नेतृत्व आहे. त्यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील राजकीय व्यक्तीसाठी नेहमीच मोलाचे ठरले आहे. माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांची प्रकृती सध्या वृद्धापकाळाने खालावली आहे. कांही दिवसापुर्वी त्यांना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. दोनच दिवसापुर्वी माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांना रुग्णालयातून सुटी मिळालेली असून ते सध्या निलंगा येथील अशोक निवासस्थानी आराम करीत आहेत. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज अशोक निवासस्थानी जाऊन माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांची पालकमंत्री निलंगेकर आस्थेने चौकशी करत पुढील उपचारासाठी मुबंई येथे यावे अशी आग्रहाची विनंती केली. पालकमंत्री निलंगेकर यांनी अशोक निवासस्थानी जाण्यापुर्वी डॉक्टरांशी चर्चा करुन माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांच्या प्रकृतीसह उपचाराबाबत माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी डॉक्टरांनी माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांना अधिक उपचारासाठी मुबंईला घेऊन जाणे उत्तम ठरेल असे पालकमंत्री निलंगेकर यांना सांगितले होते. त्यामुळेच पालकमंत्री निलंगेकर यांनी माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांना मुबंई येथे उपचारासाठी यावे असा आग्रह धरला. माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकरांनी या आग्रहास सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती पालकमंत्री निलंगेकर यांनी दिली. यापुर्वीही आपण माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांची मुबंई येथे रुग्णालयात उपचार घेत असताना भेट घेतली असल्याचा खुलासा केला. या भेटी प्रसंगी पालकमंत्री यांच्या पत्नी सौ. प्रेरणाताई पाटील निलंगेकर यांची उपस्थिती होती. माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर व पालकमंत्री निलंगेकर यांच्या भेटी दरम्यान डॉ. निलंगेकरांनी पालकमंत्र्यांना भावी वाटचालीस आशीर्वाद दिला. यापुर्वीच माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांची आपण भेट घेतली असती तर त्यांचा राजकीय अर्थ लावला गेला असता असे स्पष्ट करत आपण निवडणुका झाल्यानंतर त्यांची भेट घेतली असल्याचे पालकमंत्री निलंगेकरांनी सांगितले.


Comments

Top