HOME   टॉप स्टोरी

तहसिलच्या मागे राघूंचा मेळा

मोर वाढले, हरीणांची संख्या वाढली, पक्षी मात्र घटले, चिमण्या दिसेनात


लातूर: अलिकडच्या काळात लातूर जिल्ह्यात हरीण आणि मोरांची संख्या वाढली, वाढत आहे. पक्षी मात्र कमी होताना दिसतात. पारवे दिसतात पण चिमण्या दिसत नाहीत. पक्षीमित्र महेबूबभाईंच्या घरात चिमण्यांचा वावर दिसतो. बाकी हे दृश्य पहायला मिळत नाही. शहरात पोपटही पहायला मिळत नाहीत. मात्र लातुरच्या तहसील कार्यालयामागे असलेल्या बचत भवन परिसरात दिवसभर पोपटांची आवक जावक असते. सकाळी सहा ते नऊ आणि दुपारी चार ते सहा या काळात पोपटांची रेलचेल असते. सुदैवाने या भागात अनेक झाडे आहेत. पोपट या झाडांवर बागडत असतात. आजलातूरच्या कॅमेर्‍याने टिपलेली ही काही मनमोहक दृष्ये. तुम्हाला नक्कीच आवडतील.


Comments

Top