HOME   टॉप स्टोरी

गोपीनाथ मुंडेंची जयंती, अनुयायी संतप्त

शिवाजी चौकात घाणीचं साम्राज्य, मावळ्यांचा अवमान, मनपा काय करतेय?


लातूर: १२ डिसेंबरला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती. या दिवशी त्यांचे अनुयायी शिवाजी चौकात भक्तीभावाने उपक्रमांचं आयोजन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे त्यांनी मनपाची परवानगी काढून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण या ठिकाणची दुरावस्था पाहून कार्यकर्ते व्यथित झाले. पार्किंगच्या जागेत दारुच्या बाटल्या आणि चपलांचा खच पाहून निराश झाले. या ठिकाणी तोफ आणि मावळ्यांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्यावर अनेक दिवसांपासून धुळीचं साम्राज्य आहे. हा मावळ्यांचा अवमान नाही का? असा प्रश्न हे कार्यकर्ते करतात.


Comments

Top