HOME   टॉप स्टोरी

एक मांजर स्कूल के अंदर!

फायर, प्राणी मित्र, महावितरण, पोलिस, पत्रकार, शाळा प्रशासन सगळेच परेशान


लातूर: लातुरच्या राजस्थान शाळेजवळ केशरबाई भार्गव शाळा आहे. या शाळेच्या प्रांगणातील एका झाडावर एक मांजर जाऊन बसली. ती काही केल्या खाली उतरेना. याच झाडांच्या फांद्यातून मोठ्या वीज वाहक तारा आहेत. मांजर उदमांजर की नेहेमीची मांजर तेही कळेना. शाळेच्या प्रशासनाने मनपाकडे फोन केला. नो रिस्पॉन्स. प्राणी आणि पक्षीमित्रांना बोलावलं त्यांनाही नो रिस्पॉन्स. फायर ब्रिगेडला बोलावलं त्यांचीही तीच स्थिती. महावितरणला फोन लावला त्यांच्याकडूनही प्रतिसाद नाही. मग तिथं आलेल्या एका पत्रकाराने आपत्ती व्यवस्थापनाचे साकीब उस्मानी यांच्याशी संपर्क साधला. मग महापालिकेची गाडी आली. प्राणी मित्र प्रशांत जोजारे क्रेनमध्ये बसले आणि त्यांनी त्या मांजरीला काढायचा प्रयत्न केला. पण मांजरीने धूम ठोकली! यावेळी सर्पमित्र शाम सुरवसे, भिमाशंकर गाढवे, गांधी चौक पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल संजय गुट्टे यांनी हे बचावकार्य करण्यास मदत केली. प्राण्यांच्या बचावकार्यासाठी प्रयत्न करीत असताना महावितरणचे सहकार्य मिळत नाही अशी खंत या सर्वांनीच व्यक्त केली.


Comments

Top