HOME   टॉप स्टोरी

पोलिसांना जाळावा लागतो कचरा!

घनकचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा, पालिकेला बक्षीस का मिळाले?


लातूर: कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरचे दिवे आणि पाणी पुरवठा हे प्रश्न लातुरकरांच्या पाचवीला पुजलेले आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचे काम एका संस्थेला दिले आहे. त्यांची यंत्रणा आहे. मनपाने परवा पन्न्सहून अधिक घंटागाड्या आणल्या. त्याही सेवेत आहेत असे असतानाही गटारी तुडूंब भरलेल्या असतात. अनेक ठिकाणी सर्र्सा कचरा जळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. सामान्य लोकांचं एकवेळ बाजुला ठेऊ. सरकारी कार्यालये, पोलिस ठाणी इथलाही कचरा नियमितपणे उचलला जात नाही. परवा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या आवारातील वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचार्‍यांनी वैतागून असा कचरा पेटऊन दिला. मनपाला विनंती केली तरीही तो पूर्णपणे उचलला गेला नाही. अशीच अवस्था पंचायत समिती, तहसील, पत्रकार भवन, यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुल, गांधी चौक व्यापारीसंकुल इथंही पहायला मिळते. मनपा कचर्‍याचं नियोजन करीत नसल्यानं पोलिसांना कचरा जाळावा लागतो. अशी परवानगी कुणालाच नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय घातक आहे. घनकचरा नियोजनाची अशी अवस्था असताना पालिकेला बक्षीस कसे मिळते हे मोठे कोडे आहे.


Comments

Top