HOME   टॉप स्टोरी

प्लास्टीकचा वापर मनपा कर्मचार्‍यांच्या जिवावर

अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या, रस्त्यांवर घाण पाणी, कर्मचार्‍यांकडे संरक्षक आयुधं नाहीत


लातूर: लातुरचं कचरा व्यवस्थापन वरचेवर ढेपाळत चाललं आहे. याचं मुख्य कारण केवळ आर्थिक नियोजन नसणे हेच आहे. काल राजस्थान शाळेजवळच्या बंकटलाल शाळेला लागून असलेल्या चांगल्या आणि भव्य गटारीतली घाण साफ करण्याचा प्रयत्न पाहण्याचा योग आला. ही गटार तुंबल्यानं घाण पाणी रस्त्यावर यायचं. मनपा कर्मचार्‍यांनी ही तुंबलेली गटार साफ केली. यातून शेकडो प्लास्टीकच्या पाण्याच्या बाटल्या, दारुच्या बाटल्या, फास्ट फूडची पाकिटं या कर्मचार्‍यांनी गटारीत उतरुन बाहेर काढली. एवढं जोखमीचं काम करणार्‍या या कर्मचार्‍यांकडे गम शूज, ग्लोजही नव्हते. सगळी घाण अंगावर घेत, कधी कधी सापांचा सामना करीत त्यांना हे काम करावं लागतं.


Comments

Top