HOME   टॉप स्टोरी

अभाविपकडून नागरिकता संशोधन कायद्याचे स्वागत

विद्यार्थ्यांनी केले नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे अभिनंदन!


लातूर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर शाखेतर्फे नागरिकता संशोधन विधेयकाचे दयानंद महाविद्यालयावर स्वागत करण्यात आले. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन केले. त्याबरोबर त्यांनी नागरिकता संशोधन कायदा कशा प्रकारे आपल्या राष्ट्रासाठी हितकारी आहे हे सर्व युवकांना सांगितले. त्यावेळी ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर हा कायदा लागू झाला पाहिजे. जे सध्याला जामिया इस्लामिया व अलीगड मुस्लीम विद्यापीठात जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, अशा लोकांचं बांगलादेशी घुसखोर जे आहेत त्यांच्यासोबत नेमका काय नातं आहे, कारण हा कायदा आल्यानंतर बांगलादेशी घुसखोरी बंद होणार आहे. महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण भारतामध्ये शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनात आहे. यावेळी लातूर महानगर मंत्री सिद्धेश्वर फरकांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.


Comments

Top