HOME   टॉप स्टोरी

हरंगुळमध्ये फ्रीजचा स्फोट, बालिका बचावली

घर उध्वस्त, लाखोंचे नुकसान, सॅमसंग कंपनीचा फ्रीज, पंचनामाही झाला


रवींद्र जगताप, आजलातूर: लातूर बार्शी मार्गावरील हरंगुळ या गावी काल संध्याकाळी सॅमसंग फ्रीजचा स्फोट झाला. या स्फोटात फ्रीजवर ठेवलेले रोख चाळीस हजार रुपये जळून खाक झाले. घराचे प्रचंड नुकसान झाले. भिंती आणि छतला तडे गेले. दोन्ही खोल्यातील सामान जळून खाक झाले. सगळी वायरिंग बाद झाली. दोन्ही खोल्या खाळवंडून गेल्या आहेत. हरिश्चंद बरुरे यांच्या मालकीचे हे घर. श्रीनिवास तेलंग यांना भाड्याने दिले होते. काल तलाठी यांनी पंचनामा केला. सॅमसंग कंपनीची माणसेही येऊन गेली. या गावातले नेत, माजी सरपंच व्यंकट पनाळे आणि हरिश्चंद बरुरे यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला.
Watch vdo on youtube, pl click the link
www.youtube.com/watch?v=EZ_ZuiY4OKs&t=5s


Comments

Top