HOME   टॉप स्टोरी

रेल्वेखाली महिलेची आत्महत्या

सासरच्या मंडळीचा त्रास, पंढरपूर-निजामाबाद रेल्वेने केले तुकडे


आजलातूर: लातुरच्या बार्शी मार्गावरील उड्डाण पुलाजवळ एका महिलेनं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. या महिलेच्या शरिराचे किमान सहा तुकडे झाले झाले होते. बाजुच्याच ओसवाडीतील ती रहिवासी होती. घटना कळताच नातलगांनी घटनास्थळी धाव घेतली. तिच्या शरिराचे तुकडे एकत्र करुन चादरीखाली झाकून ठेवले. मृत महिलेचे नाव उर्मिला विशाल मस्के असं आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगा आहे. या बातमीचे चित्रिकरण करेपर्यंत लातूर अणि रेल्वेचे पोलिस आले नव्हते. वार्तांकन करुन परतताना वाटेत सायरन वाजवत जाणारी लातूर पोलिसांची गाडी घटनास्थळाकडे रवाना होताना दिसली. हरंगुळचे माजी सरपंच व्यंकट पनाळे यांनी या घटनेची माहिती आजलातूरला तातडीने कळवली.


Comments

Top