HOME   टॉप स्टोरी

अमित देशमुखांना कॅबिनेट, संजय बनसोडे राज्यमंत्री

३६ जणांनी घेतली मंत्रीपदांची शपथ, घटक पक्ष नाराज, अनेकजण राजीनाम्याच्या तयारीत


मुंबई: ठाकरे सरकारने आज मंत्रीमंडळाचा विस्तार केला. आज ३६ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात २६ कॅबिनेट तर तर १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अजित पवार महिनाभरातच दुसर्‍यांदा उप मुख्यमंत्री झाले. अजून मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाले नाही. शपथविधीनंतर काही वेळातच मंत्रीमंडळाची बैठक झाली. येत्या दोनेक दिवसात खातेवाटप होणार आहे. मित्रपक्षांना एकही मंत्रीपद दिले गेले नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचे असले तरी रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडेच असेल असं राजकीय तज्ञ सांगतात. शपथविधीनंतर अनेक नाराज आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवली आहे. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये शिवसेनेचे आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, अनिल परब, संजय राठोड, उदय सामंत, शंकरराव गडाख यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील यांना संधी मिळाली आहे. काँग्रेसकडून अशोकराव चव्हाण, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, वर्षा गायकवाड, सुनील केदार, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, केसी पाडवी, असलम शेख यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. राज्यमंत्र्यात अब्दुल सत्तार, सतेज पाटील, शंभुराजे देसाई, बच्चू कडू, विश्वजित कदम, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र यड्रावकर यांचा समावेश आहे.


Comments

Top