HOME   टॉप स्टोरी

पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विकास वाघमारे विजयी

भाजपा दुसर्‍या तर वंचित तिसर्‍या क्रमांकावर, दीड तासात लागला निकाल


लातूर: प्रभाग ११ अमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे विकास वाघमारे ७२६ मतांनी विजयी झाले. त्यांना २४७१ मते मिळाली. भाजपच्या निखिल गायकवाड यांना १७४५ तर तिसर्‍या क्रमांकावरील वंचितच्या सुजाता अजनीकरांना ८८१ मते मिळाली. शिवकुमार गवळी यांच्या निधनाने या प्रभागात पोटनिवडणूक घ्यावी लागली. या प्रभागात एकूण १५४४१ मतदान होते. त्यापैकी केवळ ५२०० जणांनी मतदान केले. नपा, मनपाच्या निवडणुकांतील हे सर्वात निचांकी मत्दान असू शकते. मनपाच्या सभागृहात मतमोजणी झाली. अवघ्या दीड तासात निकाल हाती आला. प्रभागातील विकास कामे करायची आहेत. नेत्यांच्या विश्वासामुळे हे यश मिळाले असे विकास वाघमारे यांनी आजलातूरला सांगितले.
कॉंग्रेसचे संख्याबळ आता ३४ झाले आहे. वंचितच्या राजा मनियारांच्या साथीमुळे ते ३५ वर गेले. भाजपाचे चंद्रकांत बिराजदार आणि गिता गौड यांनी साथ दिल्याने ही संख्या ३७ वर गेली आहे. म्हणजे लातूर मनपात कॉंग्रेसचे बहुमत झाले असे म्हणता येईल.


Comments

Top