HOME   टॉप स्टोरी

विद्यार्थी, पालक, खगोलप्रेमींनी पाहिले अदभूत चंद्रग्रहण

राजा नारायणलाल लाहोटी शाळेत केली होती खास व्यवस्था


लातूर: सुपर मून, ब्लड मून, रेड मू, ब्लू मून अशा अनेक अवस्थात दिसणारे खग्रास चंद्रग्रहण आज सबंध देशानं पाहिले. लातुरच्या राजा नारायणलाल लाहोटी शाळेच्या प्रांगणात लातूर विज्ञान केंद्राने याचे आयोजन केले होते. दोन शक्तीशाली दुर्बिणीतून विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि खगोल प्रेमींनी हा अदभूत सोहळा डोळ्यात साठवून घेतला. असा योग दिडशे वर्षांनी येतो असे म्हणतात. आज चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ दिसला. पृथ्वी चंद्र आणि सुर्याच्या मधोमध आली होती. यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडली. पाच वाजून ५८ मिनिटांनी या ग्रहणाला सुरुवात झाली. लाहोटी शाळेत ग्रहण सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना हा खगोलीय सोहळा समजावून सांगण्यात आला. चंद्र सुरुवातीला फिकट लाल दिसू लागला. हळूहळू त्याचा रंग खुलत गेला. साधारणत: ७.५० च्या सुमारास चंद्र तेजोमय अंगठीसारखा दिसू लागला. पुढे हे ग्रहण संपू लागले. साडे आठच्या सुमारास चंद्राचा ९५ टक्के भाग शुभ्र पांढरा तर उर्वरीत भाग काळा दिसत होता. आठ वाजून ४० मिनिटांनी चंद्र नेहमीसारखा दिसू लागला. चंद्राच्या या सगळ्या अवस्था सर्वांनी कुतुहल आणि जिज्ञासेपोटी पाहिल्या. या काळात चंद्र १४ पट मोठा आणि ३० टक्के अधिक प्रकाशमान जाणवला. नासाने या ग्रहणाला सुपर ब्लू ब्लड मून असे म्हटले आहे.
यावेळी शैलेश लाहोटी, लक्ष्मीरमण लाहोटी, अतुल देऊळगावकर, आशिष बाजपाई, कमलकिशोर अग्रवाल, संतोष भालेराव, अमोल गोवंडे, नगरसेवक सुनील मलवाड, डॉ अजय महाजन, आनंद लाहोटी, अनिल राठी, दिनेश इन्नानी, सूर्यप्रकाश धूत उपस्थित होते. चंद्रहणामुळे देशातली अनेक मंदिरे बंद राहिली. ग्रहण संपल्यानंतर साईंची आरती केली जाणार आहे. शनी मंदिरही बंद राहिले.


Comments

Top