HOME   टॉप स्टोरी

रुसले......हसले......पुन्हा परतले, का रुसले होते अ‍ॅड. बेद्रे?

समज कुणी काढली? पुन्हा कसे कामाला लागणार? कर्ता माणूस रुसून चालत नाही!


समज कुणी काढली? पुन्हा कसे कामाला लागणार? कर्ता माणूस रुसून चालत नाही!
लातूर: अ‍ॅड. व्यंकटराव बेद्रे. प्रसिद्ध विधिज्ञ. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते. कॉंग्रेसच्या अनेक विजयात योगदान देणारे, विलासवांचे खंदे समर्थक. अचानक रुसले. पदाचा राजीनामा दिला. तो प्रदेशाध्यक्षांनी स्विकारला नाही. पण गाडीतून प्लॅटफॉर्मवर उतरले हे नक्की. पण स्टेशन सोडलं नाही. त्यातच त्यांनी व्ही मित्रमंडळ काढलं. त्याला माजी आमदार वैजनाथ शिंदे यांची साथ मिळाली. आता लातुरात आणखी एक नवं स्टेशन तयार होतं की काय अशी शंका येऊ लागली. पण झाले भलतेच. आमदारांनी समज काढली आणि पाखरु पुन्हा घरात परतलं! आता बेद्रे पुन्हा नव्या जोमानं, दमानं कामाला लागणार आहेत. कॉंग्रेससारख्या एवढ्या मोठ्या संसारातला कर्ता पुरुष रुसून कसं चालेल? हे नेत्यांनी ओळखलं आणि ते पुन्हा गाडीत बसले! वर्षावर निवडणूक येऊन ठेपली आहे. दोन्ही निवडणुका महत्वाच्या आहेत, आस्तित्वाला आव्हान देणार्‍या आहेत. अशा स्थितीत आखाड्याचा मूळ पैलवान बाजुला ठेऊन कसे चालेल? तो असेल तरच आखाडा नीट चालेल, सगळे पैलवान एका तालात षड्डू ठोकतील. कारण वस्ताद तो वस्तादच असतो!


Comments

Top