HOME   टॉप स्टोरी

बोगी कारखान्यामुळे मनपाची आर्थिक बाजू भक्कम होणार!

आयुक्त, महापौर, उप महापपौरांनी मानले मुख्यमंत्री, पालकमंत्री, अभिमन्यू पवारांचे आभार


बोगी कारखान्यामुळे मनपाची आर्थिक बाजू भक्कम होणार!

लातूर: मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात लातूर रेल्वे बोगीच्या कारखान्यासाठी केंद्र शासन व राज्यशासनादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे, प्रथमच केंद्र शासनाच्या वतीने सर्वात मोठी योजना मराठवाड्याला प्राप्त होत आहे. येत्या पाच दिवसात महाराष्ट्र शासन यासाठी जामीन देणार असून, लातूर संपूर्ण जगाला मेट्रो रेल्वेचे डब्बे पाठविणार आहे. यातून ५० हजारहुन अधिक रोजगार मराठवाड्यात निर्माण होणार आहे. त्यामध्ये लातूर शहरातील नागरिकांचा फायदा जास्त होणार आहे, लातूर मनपाची आर्थिक बाजूही भक्कम होणार आहे, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री, संभाजी पाटील निलंगेकर व मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी अथक परिश्रम घेऊन त्याचा पाठपुरवा केला व प्रकल्प लातूर मध्ये आणला याबद्दल लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, आयुक्त अच्युत हंगे, सभागृह नेते अ‍ॅड शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी यांच्या वतीने आभार मानण्यात येत आहे, या प्रकल्पामुळे सर्वात जास्त फायदा हा लातूरला होणार असल्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेचे नाव जगामध्ये घेतले जाणार आहे. आजपर्यंतच्या इतिहासात मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वात मोठी मदत केंद्र शासनाकडून या रेल्वे बोगी कारखान्याच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचे आभार मानले आहेत असे आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.


Comments

Top