HOME   टॉप स्टोरी

सुंदर लातुरच्या श्रेयवादाची लढाई सुरु, भाजपा आघाडीवर

शहर सुशोभिकरण मोहिमेचा आणि मनपाचा संबंध नाही, तेव्हाच केले होते जाहीर


लातूर: सुंदर लातूर, हरित लातुरला आता आकार येऊ लागला आहे. चौक सजताहेत. डिव्हायडर रंगत आहेत, झाडे लावली जात आहेत. शहराच्या सौंदर्याला आकार येऊ लागताच श्रेयाची लढाईही सुरु झाली आहे. कालच स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सगळा उपक्रम सांगितला होता. हे काम कोण्या एकाचे नसून सर्वांच्या प्रयत्नातून घडत आहे. अनेक व्य्क्ती, संस्था, संघटना, व्यापारी प्रतिष्ठानांच्या योगदानातून हे घडत आहे असे त्यांनी स्पष्ट केले होते. कोणाही नेत्याचे अथवा पक्षाचे नाव घेतले नव्हते. पण आज सत्ताधार्‍यांना जाग आली. महापौर सुरेश पवार, उप महापौर देवीदास काळे, प्रवक्ते शैलेश स्वामी, शैलेश गोजमगुंडे यावेळी हजर होते.
ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात.....आम्ही कामे करतो
काल अशोक गोविंदपुरकरांनी पत्रकार परिषद घेताच आज तातडीने सत्ताधार्‍यांनी प्रेस घेतली. लातूर सुंदर होतंय, स्वच्छ होतंय याचा सर्वांना आनंद आहे, अभिमान आहे. पण काही लोक अकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप उप महापौर देवीदास काळे यांनी केला. गेली अनेक वर्षे या लोकांकडे सत्ता होती. तेव्हा जागोजागी कचर्‍याचे ढीग होते. आमच्या काळात सर्वांच्या मदतीने प्रामाणिकपणे काम करीत आहोत. आमचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणी करु नये असेही यावेळी बजावण्यात आले.


Comments

Top