HOME   टॉप स्टोरी

अशोकरावांनी व्यंकटेशांना सन्मानानं बसवलं गाडीत, मानाच्या सीटवर!

इतक्या निवडणुकांचा अनुभव कसा जाईल वाया? ऐन वारीला कुणाच्या पडायचं पाया?


रवींद्र जगताप, लातूर: मध्यंतरी एका हिंदी सिनेमातलं गाणं चांगलंच गाजलं होतं. उडत्या चालीचं अन सामान्य शब्द रचना असलेलं ते गाणं होतं. आजा मेरी गाडी मे बैठ जा, आजा मेरी गाडी मे बैठ जा, लॉंग ड्राईव जाएंगे, फुल स्पीड जाएंगे, कहीं रुकेंगे ना हम, खाना पिना, गाना बजाना गाडी मे होगा सनम.......एवढी सगळी आमीषं दाखवली गेली आणि गाडी मध्येच थांबली. खाना पिना तर सोडाच गाडीतूनच उतरावं लागलं. लिफ्ट मागून गावाकडं यावं लागलं. व्यंकटेशरावांना गाडीतून उतरले खरे पण त्यांनी स्टेशन तर सोडाच साधा प्लॅटफॉर्मही बदलला नाही. एकदम लॉयलिस्ट. पण सात्विक संतापानं तिकीट परत करुन टाकलं. दुसर्‍या गाडीचं काढावं असा विचारही केला नाही. वेळेत तिकिट परत केलं तर चांगला परतावा मिळतो म्हणतात. तसंच झालं. काल परवा झालेल्या प्रवाशांच्या मेळाव्यात परत केलेलं तिकीट जशाला तसं मिळालं. गाडीत प्रवेश मिळाला आणि सन्मानाची सीटही मिळाली. सम्राट अशोक भारतभूषण होता. न्याय देणारा होता. कालच्या मेळाव्यातही अशोकानं आपलं कर्तव्य बजावलं. व्यंकटेशा नावाचा अनंत काळाचा हा प्रवासी, अनेक वार्‍यात गुणानं वागलेला. त्याला वार्‍यावर कसं सोडता येईल? २०१९ ची वारी येऊ घातली आहे. या वारीत हा गुणी प्रवासी नक्की कामाला येईल हे स्टेशनमास्टर सम्राट अशोकाला कळालं होतं.
(सत्य घटनेवर आधारित पण ओळखीच्या कुणाही अशोकाशी आणि व्यंकटेशाशी नावाचा संदर्भ जोडू नये ही विनंती.)


Comments

Top