HOME   टॉप स्टोरी

ट्वेन्टीवन शुगर्स उभारणीच्या मार्कआऊट कामाला सुरुवात

वर्षभरात काम होणार पूर्ण शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या


ट्वेन्टीवन शुगर्स उभारणीच्या मार्कआऊट कामाला सुरुवात

लातूर: साखर कारखानदारी क्षेत्रात उत्सुकतेचा विषय ठरलेल्या आणि लातूर जिल्हा व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठया अपेक्षा ठेवून असलेल्या मळवटी नजिकच्या नियोजित ट्वेन्टीवन शुगर्स या प्रकल्पाच्या मार्कआऊट टाकण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे आता वर्षभरात कारखान्याची उभारणी पूर्ण होऊन आगामी गळीत हंगामात चाचणी गळीत हंगाम सुरु होणार या संबंधी विश्वास निर्माण झाला आहे. माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार (दि.२) रोजी सहकार्यांसोबत मळवटी येथील नियोजित ट्वेन्टीवन शुगर्स प्रकल्पस्थळी भेट देवून मार्कआऊट टाकण्याच्या कामाची पहाणी केली.


Comments

Top