HOME   टॉप स्टोरी

बंद रद्द, काढली मोटारसायकल रॅली, असिफाला न्याय देण्याची मागणी

लातुरचा एकोपा टिकवायचाय, बलात्कार विरोधी नवा कायदा लवकर अमलात आणावा


लातूर: कथुआ आणि उन्नाव येथील घटनांवरुन भारतीय समाजमन ढवळून निघाले आहे. सगळीकडे त्याचा निषेध सुरु आहे. असाच निषेध लातुरातही करण्यात आला. धरणे, कॅंडल मार्च, मोर्चा अशा विविध मार्गांनी निषेध करण्यात आला. या आंदोलनातील पुढील टप्पा म्हणून आज लातूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. आंदोलनाचे एवढे मार्ग स्विकारल्यानंतर पुन्हा बंद कशाला? शिवाय अशा बलात्कार करणार्‍यांच्या विरोधात केंद्राने नवा कायदाही केला आहे. याचा विचार करुन आजचा बंद रद्द करण्यात आला. या ऐवजी गंजगोलाईतून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा लवकरात लवकर अमलात आणावा अशी मागणी करण्यात आली. याचे नेतृत्व यंग मुस्लीम योद्धा संघटनेचे अध्यक्ष वाजीद मनियार यांनी केले. यावेळी लोक प्रहार संघटना, भिमराज संघटना, महाराष्ट्र मजूर संघटना, जनक्रांती सेना, व्हीएस पॅंथर्स संघटना, लोकनायक संघटना, ब्लू पॅंथर संघटना या संघटनांच्या कार्यकर्ते पदाधिकार्‍यांसह अजय सूर्यवंशी, विनय जाकते, बाबा शेख, सय्यद फेरोज, नसीर भाई, साधू भाऊ, जावेद शेख, फेरोज भाई, अ‍ॅड. रेड्डी उपस्थित होते.


Comments

Top