logo
news image आज पेट्रोल ११ तर डिझेल २४ पैशांनी वाढले news image भक्तांच्या तक्रारीवरुन मुंबईच्या लालबाग गणपतीसाठी सरकार नेमणार समिती, अनागोंदीवर उपाय news image दिल्लीत महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग, दानवे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक news image गडकरींविरोधात लढण्यासाठी स्पर्धा news image शिवस्मारकाच्या कामाला २४ ऑक्टोबरला सुरुवात news image नगर-नाशिक धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडणार news image लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या महिलेवर एमजे अकबर यांनी दाखल केला खटला news image महिलांचा आदर राखा, मीटू प्रकरणी लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया news image उस्मानाबादेत दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या अर्जून खोतकरांना राष्ट्रवादेच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव news image वो नीच आदमी है, शशी थरुरांबद्दल सुब्रण्यम स्वामी यांचे वक्तव्य news image गुजराती माणसं हुशार असतात हे खरेच आहे, ते काय करतात याचा अभ्यास केला पाहिजे- राज ठाकरे news image साजिद खानला फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजनची नोटीस, तीन महिलांनी केली होती तक्रार news image पुण्यात महालक्ष्मी मंदिरात ३०० अनाथ मुलींचं पूजन

HOME   टॉप स्टोरी

सहलीवर गेले भाजप नगरसेवक! ऐन विधानपरिषदेच्या तोंडावर!

भाजप तुला नगरसेवकांवर भरोसा नाय का? आजलातूरच्या संपादकाला गचांडी धरुन बाहेर काढले

लातूर: सगळ्याच निवडणुकात जिंकण्याचा महत्वाकांक्षा घेऊन निघालेल्या भाजपाने आता कर्नाटक निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकांवर चांगलेच लक्ष केंद्रीत केले आहे. आज लातुरच्या भाजपाने आपल्या नगरसेवकांना सहलीवर पाठवले. ही बातमी फुटली आहे हे कळताच त्यांनी ऐनवेळी तीनदा वेळा बदलल्या आणि स्थळही बदलले. अखेर राजा नारायण लाहोटी इंग्लीश स्कूलमध्ये हे सारे सापडले. पण आजलातूरच्या कॅमेर्‍यातून मात्र निसटू शकले नाहीत. यावेळी संतापलेले भाजपाचे कार्यकर्ते अप्पासाहेब मुंडे यांनी वृत्तांकन करणारे आजलातूरचे संपादक रवींद्र जगताप यांना गचांडी पकडून शाळेबाहेर काढले तेव्हा इतर पत्रकार मदतीला धावले. ही शाळा आहे असं ते म्हणाले. त्यावर मग शाळेत इतक्या नगरसेवकांचं काय काम आहे? इतक्या गाड्या शाळेत संध्याकाळी का येतात? असा प्रश्न जगताप यांनी केला. त्यावर शैलेश लाहोटी यांनी सारवासारव करीत जबरीने चहा पाजला, चांगलाच टाईमपास केला. तोवर महिला नगरसेवक आणि मिस्टर नगरसेवकांची गाडी निघून गेली. त्यानंतर काही वेळाने पुरुष नगरसेवकांची गाडी बाहेर पडली!
ही शैक्षणिक सहल आहे. याचा खर्च मी स्वत: करतोय असा दावा शैलेश लाहोटी यांनी केला. नंतर खाजगी गप्पात पक्षाचा हा कार्यक्रम आहे पक्षाचाच खर्च आहे असे त्यांनी कबूल केले. वृत्तांकन करताना यशवंत भोसले, अप्पासाहेब मुंडे आणि इतर नगरसेवकांनी व्यत्यय आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. याबाबत निवडणूक आयोग, प्रेस कौन्सिल अक्रीडेशन कमिटी आणि मानवी हक्क आयोगाकडे चित्रीकरणासह तक्रार करणार असल्याचे रवींद्र जगताप यांनी सांगितले. चित्रिकरण सुरु असताना भाजपाचे प्रवक्ते शैलेश स्वामी यांनी तोंड लपवून घेतले, काही नगरसेवक शाळेच्या पाठीमागे गेले तर काहींनी ‘आलोच’ असे सांगत काढता पाय घेतला.


Comments

Top