logo
news image लातूर मनपाने गांधी मार्केटच्या आठ दुकानांना घातले सील news image लिंगायत आरक्षणासाठी २४ ऑगस्टला लातूर जिल्हा बंद news image लिंगायत धर्माच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरु news image मनपाच्या झोन कार्यालयातच मिळणार गणेश मंडळांना परवानग्या news image लातुरच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे झाले लोकार्पण news image लातुरला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे यासाठी राबवली जातेय स्वाक्षरी मोहीम news image सनी लिओनी दत्तक मुलीसह लातुरात येणार news image लातुरच्या अशोक हॉटेल चौकातील अग्नीशमन दलाच्या जागेवर बांधणार सार्वजनिक शौचालय news image अग्नीशामक दलाला मनपा आवारात देणार जागा news image मुरुड येथे स्थापन झाले पहिले धर्मदाय डायलेसिस सेंटर news image संविधान जाळणार्‍यांना फाशी द्या, उदगीरच्या सर्वपक्षीय मोर्चाची मागणी news image ०३ सप्टेंबरपासून वसतीगृहासाठी मराठा युवक करणार लातुरात उपोषण

HOME   टॉप स्टोरी

औसा एसटीवर दगडफेक, चालक जखमी

संपात सहभागी न होता, सगळ्या गाड्या चालू ठेवण्याचा लातूर एसटीचा आदेश

लातूर: काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचर्‍यांनी पगारवाढीसाठी संप सुरु केला. यात राज्यातील बहुतांश कर्मचारी सहभागी झाले पण लातुरात सगळ्या गाड्या वेळच्या वेळी काढा, संपात सहभागी होऊ नका असा दम वरिष्ठांनी बजावला. परिणामी औसा-लातूर अशी वाहतूक करणार्‍या विनाथांबा, विना वाहक बसवर दगडफेक झाली. एक मोठा दगड वाहकाजवळच्या खिडकीवर आदळला. यात काच तर फुटलीच पण चालकाच्या पायाला जखमा झाल्या. चालक एअबी होळकर यांनी तातडीने बस स्थानकात जमा करुन वरिष्ठांकडे रिपोर्ट केला. एअवढे होऊनही सगळ्या बसेस रोजचा प्रमाणेच सोडा असा आदेश वरिष्ठांनी बजावला. याच काळात औरंगाबाद आणि पुण्याच्या गाड्या होत्या. लांब पल्ल्याच्या या गाड्या न्यायला चालक, वाहक तयार नव्हते पण त्यांना ड्युटी बजावावी लागली. नंतर दहा वाजता लातूर एसटीने गाड्या पाठवणे बंद केले!


Comments

Top