logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   टॉप स्टोरी

महापौर आणि प्रकाश पाठकांना हाकलायची खेळी!

राजीनामे कुणीच दिले नाहीत, शैलेश गोजमगुंडे यांचा दावा, लाहोटींचा शह देण्याचा प्रयत्न

लातूर: स्वच्छ, चारित्र्यवान आणि प्रभू रामचंद्राचा वारसा सांगणार्‍या लातुरच्या भाजपात अनेक शकुनी मामा तयार झाले आहेत. मनपात तर एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणाने कळस गाठला आहे. जेवढे पदाधिकारी तेवढे गट, त्यात शैलेश लाहोटींचा वेगळाच गट. काही स्वतंत्र गट. कॉंग्रेसमध्ये कधी बघितली नाही एवढी गटबाजी भाजपाच्या मनपात दिसते. कुणाचा पायपोस कुणाला नसतो. कुणीही नीट माहिती देत नाही. सगळेजण आपापल्या दुकानदारीत व्यग्र असतात असा दावा कॉंग्रेसचे नेते करतात.
महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे, स्थायी समितीचे सभापती शैलेश गोजमगुंडे, तीन स्विकृत सदस्य अशा साधारणत: दहा पदाधिकार्‍यांचे राजीनामे पक्षाच्या आदेशानुसार घेण्यात आले अशी माहिती शैलेश लाहोटी देतात. महापौर आपल्या कामात कुचकामी ठरले आहेत आणि स्विकृत सदस्य प्रकाश पाठक डोईजड झाले आहेत. या दोघांना बाजुला करण्यासाठी ही खेळी खेळली जात आहे. आज महापौरांचा राजीनामा आला आहे. एवढ्यावर विरोधकांचं समाधान नाही. महापौरांना अपात्र ठरवले गेले पाहिजे असे स्थायी समितीचे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर सांगतात.
दरम्यान या सगळ्यांचे राजीनामे आधीच घेण्यात आले आहे. काल फक्त ही बातमी ‘फुटली’ असं काहीजण सांगतात. भाजपाच्या खेळीत शैलेश गोजमगुंडे, देवीदास काळे यांना काहीच होणार नाही यांची पदे, नियुक्त्या तशाच राहतील असाही दावा गोविंदपूरकर करतात. महापौर म्हणून सुरेश पवार यांचे कार्य शून्य आहे. कुठल्याही विषयात महत्वाची कामगिरी बजावली नाही. नवीन निधी आणणे त्यासाठी पाठपुरावा करणे अशा बाबी महापौर करीत नाहीत. आता भाजपाला आपल्याशिवाय पर्याय राहिला नाही असा भ्रम महापौरांचा झाला आहे असेही बोलले जाते.


Comments

Top