logo
news image कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी आल्या शिवसेनेत news image लातूर जिल्ह्यात ६२.१७ टक्के मतदान news image लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान ६५.६५ टक्के news image सर्वात कमी मतदान लातुर शहरात ५७.३७ news image १० कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क news image जम्मू काश्मिरात पार पडलं दुसर्‍या टप्प्यातलं मतदान news image अभिनेता रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी यांनी केलं मतदान news image अखिलेश यादव यांनी दाखल केली लोकसभेसाठी उमेदवारी news image टीव्हीवर मोदी सरकारच्या जाहिराती चालूच news image देशाची काळजी मुळीच नाही शिवसेना दिल्लीत पाठवणार वाघ, शिवसेनेची जाहिरात news image मोदी निवडणुकीत जातीचं कार्ड वापरतात- राज ठाकरे news image मोदींनी पैसे बुडवणार्‍यांना देशाबाहेर पाठवले- राज ठाकरे news image मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा चीनमधून मागवला- राज ठाकरे news image राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा आणि सभा थांबवण्याचा सरकारचा विचार

HOME   टॉप स्टोरी

विद्यार्थ्याचा खून: बहिणीच्या लग्नासाठी चालवायचा रिक्षा

रात्रभर घेतला शोध, कुणालाच सापडला नाही, सकाळी सापडले ते प्रेतच

लातूर: लातुरच्या बसवेश्वर महाविद्यालयात बीएसडब्ल्य़ूचे शिक्षण घेणार्‍या शिवम मेंगले या तरुणाचा खून झालाय. त्याचं प्रेत आज सकाळी अकराच्या सुमारास सापडलं. शिवम मुळचा चिंचोली बल्लाळनाथचा रहिवासी आहे. पुढच्या महिन्यात त्याच्या बहिणीचे लग्न ठरले होते. या लग्नासाठी मदत होईल म्हणून फावल्या वेळेत रिक्षा चालवत असे. काल रात्री तो घराकडे परतलाच नाही. घरच्यांनी पोलिसात धाव घेतली पण उपयोग झाला नाही. रेल्वे स्टेशनचे पॅसेंजर आहेत त्यांना सोडून घरी येतो असा त्याचा शेवटचा फोन होता असे घरचे सांगतात. एमाआयडीसी पोलिस ठाण्याने या प्रकरणाची नोंद घेतली आहे. शिवमला दगडाने ठेचून मारले असावे असा अंदाज आहे. या प्रकरणाला प्रेम प्रकरणाचीही किनार असल्याची कुजबुज तेथे जमलेल्या विद्यार्थ्यातून ऐकू आली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे.


Comments

Top