logo
news image कॉंग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी आल्या शिवसेनेत news image लातूर जिल्ह्यात ६२.१७ टक्के मतदान news image लातूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक मतदान ६५.६५ टक्के news image सर्वात कमी मतदान लातुर शहरात ५७.३७ news image १० कोटी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क news image जम्मू काश्मिरात पार पडलं दुसर्‍या टप्प्यातलं मतदान news image अभिनेता रजनीकांत, कमल हसन, हेमा मालिनी यांनी केलं मतदान news image अखिलेश यादव यांनी दाखल केली लोकसभेसाठी उमेदवारी news image टीव्हीवर मोदी सरकारच्या जाहिराती चालूच news image देशाची काळजी मुळीच नाही शिवसेना दिल्लीत पाठवणार वाघ, शिवसेनेची जाहिरात news image मोदी निवडणुकीत जातीचं कार्ड वापरतात- राज ठाकरे news image मोदींनी पैसे बुडवणार्‍यांना देशाबाहेर पाठवले- राज ठाकरे news image मोदींनी सरदार पटेलांचा पुतळा चीनमधून मागवला- राज ठाकरे news image राज ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्याचा आणि सभा थांबवण्याचा सरकारचा विचार

HOME   टॉप स्टोरी

पत्रकारांचे पोलिसांविरुद्ध आंदोलन, जिल्हाधिकारी घालणार लक्ष

पत्रकारांनी गांधी चौकात केली निदर्शने, धरणे धरली, मांडली व्यथालातूर: लातूर जिल्ह्यातील पत्रकारांना सातत्याने पोलिसांकडून अवमानास्पद वागणूक मिळते याचा निषेध आज पत्रकारांनी केला. गांधी चौकात धरणे धरली, निदर्शने केली. त्यानंतर सर्वांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची भेट घेतली. परवा तिरंगा आरोहणाच्या कार्यक्रमात मंत्र्यांची मुलाखत घ्यायला निघालेल्या आनंद दणके यांना पोलिसांनी अरेरावी केली. उचलून चक्क बाजुला केले. त्या आधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्याचा पाढा दीपरत्न निलंगेकर यांनी वाचला. आपण सारेच जनतेसाठी काम करतो, मग पोलिसांची मुजोरी कशासाठी? असा प्रश्न त्यांनी केली. जिल्हाधिकार्‍यांनी सगळे म्हणणे ऐकून घेतले आणि पोलिस अधीक्षकांशी बोलून घेतो असे आश्वासन दिले. पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे, व्हीआयपी पासेस मिळालेच पाहिजेत, यावेळी पिडीत आनंद दणके, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरसिंह घोणे, मोहसीन खान, राजकुमार सोनी, रविकिरण सूर्यवंशी, रघुनाथ बनसोडे, दत्ता काळे, नितीन हंडे, नितीन बनसोडे, युवराज कांबळे, सतीश तांदळे, इस्माईल शेख, हारुण सय्यद, हारूण मोमीन, निशांत भद्रेश्वर, महेंद्र जोंधळे, अमर करकरे, सुरेश गवळी, बालाजी पिचारे, वामन पाठक, मासूम खान उपस्थित होते.


Comments

Top