HOME   टॉप स्टोरी

लातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती

मतदान जागृतीचे अनोखे अभियान


लातूरच्या कला शिक्षकांनी साकारल्या बोलक्या भिंती

लातूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ४१ लातूर (अ.जा.) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मतदानाचा टक्का वाढवा या उद्देशाने लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कल्पनेतून व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीनजी ईटनकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी औदुबंर उकिरडे, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली जामदार, शिक्षण विस्तारधिकारी शिवाजी होळीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरच्या महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघटनेने शहरातील विविध दर्शनी ठिकाणी भिंतींवर सुंदर चित्रे साकारुन नागरीकाना मतदान करण्याचा संदेश दिला आहे. शहराच्या मुख्य मार्गावर लोकांच लक्ष वेधून घेणाऱ्या बोलक्या भिंती आकर्षणाचं केंद्र बिंदू बनल्या आहेत. काही नागरीक तर चक्क सेल्फी काढत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने व शिक्षण विभागाच्या माध्यमातून लातुरच्या विविध शाळेतील कलाशिक्षकांनी एकत्र येवून हा अभिनव स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या रंगरंगोटी मुळे मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढावी व लोकांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी हा उदेश प्रशासनाचा व कलाध्यापक संघटनेचा दिसून येत आहे. या राष्ट्रीय कार्यात कलाशिक्षक शिवाजी हांडे, अशोक तोगरे, पद्माकर वाघमारे, अनिस हाश्मी, गणेश राठोड, सचिन रणखांब, जितेंद्र जगताप, दीपक राऊत, दत्तात्रय धुळशेट्टी, तेजेश शेरखाने, राजू वेदपाठक, राजेश आंबटवार, अमित परतवाड, योगेश साळवे, दत्ता मुंडे, प्रमोद टेकले, मनोज बनाळे, अनिस हाशमी, बाळासाहेब बावणे, राजकुमार नामवाड, प्रवीण बडीकर, देशमुख पजे, वर्षा सांडे, सुनीता सावंत, अंजली माने, श्रीमती सोनवणे आदिंनी चित्रे रंगवून मतदान जागृतीचा संदेश दिला आहे.


Comments

Top