logo
news image डॉल्बी बंदीमुळे पुण्यातल्या १२५ मंडळांचा विसर्जनावर बहिष्कार news image विसर्जनामुळे मुंबईच्या चौपाट्यांवर कडक बंदोबस्त news image ‘डेई’ वादळाचा फटका आठ राज्यांना बसण्याची शक्यता news image राष्ट्रवादीतून उदयनराजेंचा पत्ता कट होण्याची शक्यता, आमदारांनी केली शरद पवारांकडे तक्रार news image बच्चू कडू रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार news image शेतकर्‍यांना साले म्हटल्याचा बच्चू कडूंना संताप news image भारतीय चित्रपट ‘विलेज रॉकस्टार’ ऑस्करच्या स्पर्धेत जाणार news image शांतता चर्चेला नकार भारत अहंकारी- पाक पंतप्रधान इम्रान खान news image बीडच्या दहावी नापास विद्यार्थ्यानं तयार केली ३० हजारात जीप news image फ्रान्सचे माजी राष्ट्रपती मोदींना चोर म्हणाले- राहूल गांधी news image १२४ गावातला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द, त्या आधीच पडला पाऊस news image राज्यात पाच किटकनाशकांवर दोन महिने बंदी news image विसर्जनात डॉल्बी वाजणार नाही विश्वास नांगरे पाटील यांचा उदयनराजे यांना इशारा news image केंद्राच्या आयुष्यमान योजनेची आज पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात, १० कोटी जणांना मिळणार विम्याचा लाभ news image आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामना

HOME   लातूर न्यूज

वीज बिलामुळे शेतकर्‍याने आत्महत्येचा केला प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

महावितरणच्या कार्यालयात घडली घटना, आशिर्वाद रुग्णालयात उपचार सुरु

वीज बिलामुळे शेतकर्‍याने आत्महत्येचा केला प्रयत्न, प्रकृती चिंताजनक

लातूर: सततची नापिकी आणि कर्जाचे ओझे यामुळे शेतकरी आत्महत्या करतात आता महावितरणच्या बिलामुळे आत्महत्या करण्याची वेळ एका शेतकर्‍यावर आली आहे. या शेतकर्‍यानं रोगर नावाचं विषारी किटकनाशक प्राशन केलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्या करण्याचा प्रयत्न महावितरणच्याच कार्यालयात घडल्यानं खळबळ उडाली आहे. औसा तालुक्यातील एकंबी तांड्यावर शहाजी राठोड यांची अडीच एकर जमीन आहे. त्यांना शेतीपंपाचं वीज बील ५९ हजार रुपये इतकं आलं आहे. अलीकडे थकित बिलांमुळे वीजपंपांचे कनेक्शन तोडले जात आहेत. त्यांचेही कनेक्शन तोडण्यात आले होते. याचा धसका त्यांनी घेतला होता. हे वीज बील कमी करावे किंवा त्याचे हप्ते पाडून द्यावेत आणि पुन्हा वीज जोडणी द्यावी यासाठी शहाजी यांनी औसा आणि उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या पण त्याला यश आले नव्हते. आज सकाळी उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात आणखी एकदा विनंती केली. पण कुणीच ऐकलं नाही. अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समोर त्यांनी सोबत आणलेले रोगर नावाचे किटकनाशक प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. लातुरच्या आशिर्वाद रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे.


Comments

Top