logo
news image लातुरात घरफोडी करणार्‍या दोघांना पुण्यात अटक news image लातुरच्या इपीस पेशनधारकांनी पेन्शनवाढीसाठी पंतप्रधानांना पाठवली पाच हजार पोस्टकार्डे news image मारुती महाराज साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याच्या हालचाली सुरु news image उद्योग क्षेत्रपासून कृषी क्षेत्रात होणार्‍या गुंतवणेकीचे प्रमाण राज्यांनी वाढवावे- पंतप्रधान news image नागरिकांवर सरकारी जाहिरातींच्या होणार्‍या परिणामांचे सर्वेक्षण केले जाणार news image मंत्रालयात लावणार ४५० सीसीटीव्ही कॅमरे news image महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात २५ टक्क्यांहून कमी पाऊस news image विधान परिषदेच्या ४ जागांसाठी २५ जूनला मतदान news image भय्युजी महाराज डावखुरे असताना त्यांनी उजव्या हातांनी गोळी झाडली कशी? पोलिसांकडून तपास news image रेल्वेत व्हॅक्यूम शौचालये वापरण्याचा विचार सुरु, अशी ५०० शौचालये मागवली news image पंजाब बॅंकेला फसवणार्‍या नीरव मोदीकडे सहा पासपोर्ट्स! news image कारागृहात शिक्षा भोगणार्‍या शेतकर्‍यांनाही मिळाली शेती कर्जमाफी news image सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 news image हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर news image अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 news image लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 news image ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501

HOME   टॉप स्टोरी

शेतकर्‍यांनी आता महावितरणच्या कर्मचार्‍यांना विष पाजावे, आपण घेऊ नये!

राजकुमार सस्तापुरे आणि कार्यकर्त्यांचे आवाहन, एकंबीच्या शेतकर्‍याची प्रकृती अजूनही चिंताजनक

लातूर: महावितरणच्या ५९ हजाराच्या बिलापायी हतबल झालेल्या एकंबीच्या श्हाजी राठोड या अल्पभूधारक शेतकर्‍याने महावितरणच्या कार्यालयात विषारी औषध घेतले होते. लातुरच्या आशिर्वाद रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आजही त्याच्या तब्येतीत सुधारणा झालेली नाही, चिंताजनकच आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रुग्णालयात जाऊन त्याची अवस्था पाहिली, डॉक्टरांशी चर्चा केली. राठोड यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही पण ती जैसे थे आहे असे डॉक्टरांनी सांगितले.
महावितरणने हे वीज बील कमी करावे किंवा त्याचे हप्ते पाडून द्यावेत आणि पुन्हा वीज जोडणी द्यावी यासाठी शहाजी यांनी औसा आणि उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या पण त्याला यश आले नव्हते. काल सकाळी उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात आणखी एकदा विनंती केली. पण कुणीच ऐकलं नाही. अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समोर त्यांनी सोबत आणलेले रोगर नावाचे किटकनाशक प्राशन केले होते.
आज सस्तापुरे यांनी हे सबंध प्रकरण जाणून घेतले. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात. आता महावितरणमुळे ते आत्महत्येचा प्रयत्न करीत आहेत. सरकारने शेतकर्‍यांची बाजू समजून नाही घेतली तर याचा उद्रेक होईल. शेतकर्‍यांनी असा टोकाचा निर्णय घेऊ नये. महावितरणचे अधिकारी-कर्मचारी वीज पुरवठा तोडत असतील तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना धडा शिकवू, विष घेण्याची वेळ आली तर त्या अधिकारी-कर्मचार्‍याला विष पाजावे. मरण्यासाठी नाही तर लढण्यासाठी तयार रहावे असे आवाहन राजकुमार सस्तापुरे यांनी केले.


Comments

Top