• 20 of March 2018, at 7.17 am
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   लातूर न्यूज

जानेवारीत कर भरणार्‍यांना मनपा देणार व्याजात ५० टक्के सूट

जानेवारीत कर भरणार्‍यांना मनपा देणार व्याजात ५० टक्के सूट

लातूर: लातूर महानगरपालिका हद्दीतील सर्व थकीत मालमत्ताधारकांसाठी मनपाने थकीत असलेल्या थकबाकी करावरील व्याजाच्या आकारणीत लातूर मनपाने शिथीलता आणली आहे. जानेवारी २०१८ मध्ये संपूर्ण कराची रक्क्म भरणा करणार्‍या मालमत्ताधारकांना व्याजामध्ये ५०% सूट देण्यात येत आहे. तर फ़ेब्रुवारी २०१८ भरणार्‍या मालमत्ताधारकांना २५% सूट देण्यात येणार आहे. यानंतर भरल्या जाणार्‍या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मार्च महिन्यात जे नागरिक कर भरतील त्यांना कसलीही सूट देण्यात येणार नाही. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा आयुक्त अच्युत हांगे यांनी केले आहे.


Comments

Top